
Pune Grand Tour 2026 Winner: पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा थाटात समारोप झाला. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले असून अंतिम दिवशी तब्बल 14 लाख नागरिकांनी सायकलपटूंच्या स्वागतासाठी उपस्थिती लावली होती. या स्पर्धेत चीनच्या ली निंग स्टार संघाकडून खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या ल्यूक मुडग्वे याने वैयक्तिक विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर सांघिक विजेतेपदावरही ली निंग स्टार संघाने आपली मोहोर उमटवली. स्पर्धेच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यात ली निंग स्टार संघाच्याच ॲलिक्सेई श्नायर्को याने 1 तास 56 मिनिटे 54 सेकंदात शर्यत पूर्ण करत पहिला क्रमांक मिळवला. या टप्प्यात पुणे शहरातून 95 किलोमीटरचा मार्ग सायकलपटूंनी पार केला, ज्यामध्ये तब्बल 578 मीटर उंचीची चढाई होती.
Post a Comment
0Comments