भाजप आणि शिवसेनेच्या गटनोंदणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने महापौर निवडणूक पुढे ढकलण्यात आलीय.मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 31 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता .नवीन महापौराची निवड फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.पालिकेच्या निवडणुकीनंतर 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते तसेच 31 जानेवारी रोजी महापौर निवडीची जाहिरात देण्याची तयारी प्रशासनाने केली होती. मात्र रात्री उशिरा हा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
गटनोंदणी पूर्ण न झाल्याने महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. भाजप आणि शिवसेना युतीबाबत एकत्रित गट स्थापन होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. महापौरपदावर भाजपने दावा केला असून, शिवसेनेनेही महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्ष पदावर दावा करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील अंतर्गत चर्चा आणि वाद मिटल्याशिवाय एकत्रित गटनोंदणी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतरच महापौर निवड प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
.jpg)
Post a Comment
0Comments