Palash Muchhal Breaks Silence On Rs 40 Lakh Sangli Fraud Allegation: गेल्या काही दिवसात शांत झालेल्या चर्चांना आता पुन्हा उधाण आलं आहे. ही चर्चा पलाश मुच्छलची आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिचा माजी होणारा पती म्हणून ओळखला जाणारा गायक आणि चित्रपट दिग्दर्शक पलाश मुच्छल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्मृतीसोबत लग्न मोडल्यापासून त्यावर अनेक आरोप केले जात आहेत. त्याच्यावर स्मृतीला फसवल्याचं आरोप केला आहे. आता त्यावर अजून एक आरोप लावण्यात आला आहे. स्मृती मंधानाच्या एका मित्राने पलाशवर तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. विज्ञान मानेनावाच्या व्यक्तीने पलाश मुच्छलवर आरोप केला आहे की, त्याच्याकडून एका चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतल्यानंतर ती परत करण्यात आलेली नाही
पलाश मुच्छलने आरोप फेटाळले
हे आरोप सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल झाल्यानंतर पलाश मुच्छलने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे प्रतिक्रिया दिली. या सर्व आरोपांवर पलाश मुच्छल याने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले आहेत. “सांगलीतील विज्ञान माने यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत. माझी प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने हे आरोप केले जात आहेत. माझे वकील श्रेयांश मितारे या प्रकरणाकडे लक्ष देत असून, आम्ही कायदेशीर मार्गाने याला योग्य उत्तर देणार आहोत,” असे पलाशने स्पष्ट केले.
.jpg)
Post a Comment
0Comments