लष्कर कोर्टातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी ॲड. अंकिता गव्हाणे यांचा पाठपुरावा; नेतृत्वाचे कौतुक
पुणे | प्रतिनिधी
लष्कर न्यायालयातील रिक्त न्यायाधीशांची पदे भरण्यासाठी ॲड. अंकिता गव्हाणे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर न्यायाधीशांची नियुक्ती झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयीन कामकाजातील महत्त्वाचा प्रश्न सातत्याने मांडत त्यांनी या विषयाकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते.
समाजातील ज्वलंत प्रश्नांवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रभावीपणे भाष्य करणाऱ्या आणि सामाजिक समस्यांना कवितेतून वाचा फोडणाऱ्या ॲड. अंकिता गव्हाणे यांनी आता लष्कर न्यायालयातील न्यायाधीशांच्या रिक्त पदांचा प्रश्न पुढे आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि कृतीशील भूमिकेचे कौतुक होत आहे.
पुण्यातील लष्कर न्यायालयात मंजूर असलेल्या पाच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या पदांपैकी तीन पदे रिक्त असल्याने न्यायालयीन कामकाजावर ताण येत आहे. ही पदे तातडीने भरण्यात यावीत, यासाठी ॲड. गव्हाणे यांच्या पुढाकाराने हडपसरचे आमदार चेतन विठ्ठलराव तुपे यांना निवेदन देण्यात आले.
या संदर्भात आमदार चेतन विठ्ठलराव तुपे यांना निवेदन देऊन रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली होती. या उपक्रमात ॲड. भरत पवार, ॲड. सचिन थोरात, ॲड. विजय भगत, ॲड. नितीन साळवे, ॲड. प्रियंका कात्रे आणि ॲड. सूरज आव्हाड यांनीही सहभाग नोंदविला.
सामाजिक प्रश्नांवर कविता आणि लेखनातून प्रभावी भाष्य करणाऱ्या ॲड. अंकिता गव्हाणे यांनी न्यायालयीन व्यवस्थेतील प्रश्नासाठी प्रत्यक्ष पुढाकार घेतल्याने त्यांच्या सामाजिक जाणिवेची आणि कृतीशील भूमिकेची दखल घेतली जात आहे. प्रश्नांची जाण, मुद्देसूद मांडणी आणि त्यावर पाठपुरावा करण्याची धडाडी ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये ठरली आहेत.
न्यायालयीन व्यवस्थेतील अडचणी दूर होऊन पक्षकारांना वेळेत न्याय मिळावा, या दृष्टीने अशा प्रयत्नांना महत्त्व आहे. ॲड. गव्हाणे यांचा हा पुढाकार वकीलवर्गातील सक्रिय सहभागाचे सकारात्मक उदाहरण ठरत आहे.
— न्याय विश्व साप्ताहिक कायदा जाणा—जागरूक बना!
Post a Comment
0Comments