पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांच्या नावाची जोरदार चर्चा!
“शिक्षकांचा आवाज विधान परिषदेत पोहोचवायचा असेल, तर गावडे सरांना संधी द्या!”
पुणे विभाग : प्रतिनिधी
पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीकडे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारांमध्ये उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली असून, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे सर यांच्या नावाला विशेष पसंती मिळत असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.
शिक्षकांच्या सेवा-सुरक्षा, पेन्शन, अनुदान, भरती, पदोन्नती तसेच अशैक्षणिक कामांचा वाढता भार यांसारख्या प्रश्नांना विधान परिषदेत अभ्यासपूर्ण आणि ठाम आवाज मिळणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या कौस्तुभ गावडे सरांच्या उमेदवारीकडे शिक्षक आशेने पाहत आहेत.
“केवळ आश्वासन देणारा नव्हे, तर शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत लढणारा प्रतिनिधी हवा,” अशी भावना शिक्षकांमध्ये व्यक्त होत असून, “कौस्तुभ गावडे सरांना संधी द्यावी,” असा सूर दिवसेंदिवस अधिक बुलंद होत असल्याचे चित्र आहे.
शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, शैक्षणिक क्षेत्राशी असलेली जवळीक आणि व्यापक संपर्क या बळावर कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी आगामी निवडणुकीत प्रभावी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिक्षकांचा विश्वास, कार्यकर्त्यांची ताकद आणि परिवर्तनाची अपेक्षा—कौस्तुभ गावडे यांच्या नावाची चर्चा आता निर्णायक वळणावर!
— न्याय विश्व साप्ताहिक
Post a Comment
0Comments