अँड.बसवराज जिगजेणि यांच्या अकाली व आकस्मिक निधनाने मन सुन्न झाले आहे…
ही बातमी खरी आहे यावर विश्वास बसत नाही.
न्यायासाठी झटणारा, समाजासाठी झिजणारा, प्रत्येकाशी आपुलकीने वागणारा एक सच्चा माणूस आज आपल्यातून निघून गेला. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे असलेली माणुसकी, त्यांचा ठाम आवाज आणि न्यायप्रिय वृत्ती आता केवळ आठवणींत उरली आहे.
त्यांच्या जाण्याने संख व परिसरातील संपूर्ण गावशिवार शोकसागरात बुडाले आहे. न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
अजून खूप काही देणारा माणूस इतक्या लवकर निघून जावा, हे नियतीचे क्रूर रूप आहे. त्यांच्या निधनाने समाजाने, वकील बांधवांनी आणि आप्तस्वकीयांनी एक आधारवड गमावला आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो.
कुटुंबीयांना या असह्य दुःखातून सावरण्याची ताकद देवो.
भावपूर्ण व श्रद्धांजली.
🕯
Post a Comment
0Comments