मुंबई | प्रतिनिधी
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा (BCMG) यांच्या सन 2026 च्या निवडणुकीकरिता दिनांक 24 मार्च 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठीची प्राथमिक मतदार यादी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, सर्व नोंदणीकृत वकिलांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही याची तात्काळ खात्री करावी, असे आवाहन बार कौन्सिलकडून करण्यात आले आहे.
वकील मतदारांनी आपले नाव खालील अधिकृत लिंकवर तपासावे –
👉 https://wkastudio.com/MobileHome.html�
“Status Verification Not Submitted” किंवा नाव न दिसल्यास काय करावे?
प्राथमिक मतदार यादीमध्ये ज्या वकील मतदारांचा “status verification not submitted” असा उल्लेख दिसत आहे किंवा ज्यांचे नाव मतदार यादीत आढळून येत नाही, अशा वकिलांनी पुढील कार्यवाही तातडीने करणे आवश्यक आहे –
Verification documents सादर करताना भरलेल्या ₹100/- शुल्काची पावती / payment screenshot
खाली दिलेल्या ठराविक फॉरमॅटमध्ये अर्ज
हे सर्व कागदपत्रे पुढील दोन्ही ई-मेल आयडीवर पाठवावीत –
📧 bcmgsanadrenewal2015@gmail.com
📧 bcmgsanadrenewal@gmail.com
तसेच पाठपुराव्यासाठी खालील दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा –
📞 022-69381033 / 022-69381037 / 022-69381056
हरकत नोंदवण्याची अंतिम मुदत – 12 फेब्रुवारी 2026
प्राथमिक मतदार यादीबाबत हरकत, दुरुस्ती किंवा नाव समाविष्ट करण्यासाठी अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2026 असून, या तारखेनंतर कोणत्याही वकील मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाणार नाही, याची सर्व वकील बंधू-भगिनींनी विशेष नोंद घ्यावी, असे बार कौन्सिलने स्पष्ट केले आहे.
हरकत अर्जाचा नमुना (संक्षेप)
हरकत नोंदवताना वकिलांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, मुंबई यांना संबोधित अर्जात खालील माहिती नमूद करणे आवश्यक आहे –
Transaction / UTR नंबर
वकिलाचे पूर्ण नाव
सनद क्रमांक व नोंदणी तारीख
AIBE (COP) क्रमांक (2010 नंतर नोंदणी असल्यास)
व्यवसायाचे ठिकाण
मतदानासाठी सोयीचे ठिकाण (नोंदणीकृत बार व्यतिरिक्त असल्यास)
नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी
यासोबत सनद प्रत, AIBE प्रमाणपत्र, Passing Certificate व शुल्क पावती जोडणे आवश्यक आहे.
मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी तात्काळ कार्यवाही आवश्यक
बार कौन्सिल निवडणूक ही वकिलांच्या व्यावसायिक स्वायत्ततेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने, मतदानाचा हक्क अबाधित राहावा यासाठी प्रत्येक वकिलाने वेळेत नाव पडताळणी व हरकत नोंदवणे अत्यावश्यक आहे, असे मत कायदेविषयक जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पडताळणीसाठी केंद्र उभारण्याची मागणी
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा (BCMG) निवडणूक–2026 साठी प्राथमिक मतदार यादी जाहीर झाल्यानंतर अनेक वकिलांची नावे अद्याप पडताळणीअभावी मतदार यादीत समाविष्ट नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर तात्काळ मतदार पडताळणी व हरकत नोंदणी केंद्र उभारण्यात यावीत, अशी जोरदार मागणी वकिलांकडून करण्यात येत आहे.
ऑनलाईन प्रक्रिया, ई-मेलद्वारे कागदपत्रे पाठवण्यातील अडचणी आणि अल्प मुदत लक्षात घेता, प्रत्यक्ष केंद्र उपलब्ध झाल्यास हजारो वकिलांचा मतदानाचा हक्क वाचेल, असे मत वकील संघटनांनी व्यक्त केले आहे. बार कौन्सिलने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Post a Comment
0Comments