सांगली वकील संघटनेच्या स्नेहसंमेलनानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
सांगली: न्याय विश्व प्रतिनिधी
सांगली वकील संघटना ही महाराष्ट्रातील एक जुनी, प्रतिष्ठित व सक्रिय वकील संघटना म्हणून ओळखली जाते. वकिलांमधील आपुलकी, सौहार्द व सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने संघटनेच्या वतीने दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते.
याच स्नेहसंमेलनाच्या अनुषंगाने सन २०२६ साठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ व रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक वकिलांनी आपल्या संघाची यादी व प्रवेश फी रु. ३,०००/- संघटनेच्या कार्यालयात बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजीपर्यंत जमा करावी, असे आवाहन सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. अशोकराव वाघमोडे यांनी केले आहे.
सदर क्रिकेट स्पर्धेमुळे वकिलांमध्ये खेळाडूवृत्ती, संघभावना व परस्पर स्नेह अधिक दृढ होणार असून स्नेहसंमेलनाला उत्साहाचे वातावरण प्राप्त होणार आहे. स्पर्धेचे ठिकाण व वेळ याबाबतची सविस्तर माहिती लवकरच स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचेही अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.
Post a Comment
0Comments