सांगली, प्रतिनिधी :
कैलासवासी ॲड. एस. जी. मुतालिक यांच्या न्यायनिष्ठा, समाजाभिमुख विचारसरणी आणि सर्वसामान्यांप्रती असलेल्या सेवाभावाचा समृद्ध वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. संदीप मुतालिक यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
स्वर्गीय ॲड. एस. जी. मुतालिक यांनी तब्बल चार दशके सर्वसामान्य, पीडित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या स्मरणार्थ आजही दिला जाणारा “आदर्श कामगार पुरस्कार” त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी ठेवा मानला जातो.
याच उज्ज्वल परंपरेचा वारसा जपत ॲड. संदीप मुतालिक यांनी गेल्या ३१ वर्षांपासून कामगार न्यायालयामध्ये कामगार, पीडित आणि दुर्बल घटकांची बाजू प्रभावीपणे मांडत न्यायव्यवस्थेवर समाजाचा विश्वास अधिक दृढ करण्याचे कार्य केले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी रोटरीच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून तसेच सध्या विश्वस्त म्हणून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील आधुनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी या उद्देशाने सुमारे ८५ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक मॅमोग्राफी यंत्र उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
याशिवाय, शिवाजी विद्यापीठात कामगार कायद्यावरील मार्गदर्शक म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्या विधी ज्ञानाला शैक्षणिक क्षेत्रातही मान्यता मिळाली आहे. नवोदित वकिलांच्या व संघटनेच्या प्रगतीसाठी तसेच समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत.
भाजपच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व महिला प्रदेशाध्यक्ष माननीय केळकर मॅडम यांचे बंधू म्हणूनही त्यांनी सामाजिक कार्याची समृद्ध परंपरा पुढे नेली असून, न्याय, सेवा आणि समाजहित या मूल्यांचा सातत्याने पुरस्कार केला आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त विधी, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेच्या कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
Post a Comment
0Comments