🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨
*न्याय विश्व साप्ताहिक*
*1) सोशल मीडियावर ‘डिजिटल अरेस्ट’चा धोका – सर्वोच्च न्यायालयाची गंभीर टिप्पणी*
मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवताना काही डिजिटल प्लॅटफॉर्म्सना “ब्लॅकमेलर” असे संबोधले. त्यांनी म्हटले की, सोशल मीडियावरील काही प्रकारचे वर्तन हे “डिजिटल अरेस्ट”सारखे आहे – जरी ते सध्या गुन्हा म्हणून घोषित नसले तरी त्याचे परिणाम गंभीर आहेत.
*प्रकरण*
हेमेंद्र पटेल *विरुद्ध* युनियन ऑफ इंडिया
*2) “स्वयंपाक न करणे म्हणजे क्रूरता नाही” – सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी*
पतीने पत्नीविरुद्ध घटस्फोटासाठी दाखल केलेल्या क्रूरतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.
*न्यायालयाचे निरीक्षण :*
* पत्नीने स्वयंपाक किंवा घरकाम नीट न केल्याच्या आरोपांना “क्रूरता” मानता येणार नाही
* “तुम्ही नोकराणीशी नव्हे, तर जीवनसाथीशी लग्न करता” – *न्यायमूर्ती मेहता*
* “आजच्या काळात पतीनेही घरकामात सहभाग घ्यायला हवा” – *न्यायमूर्ती नाथ*
* प्रकरण xxx v xxx
*3) कर्ज वसुलीसाठी फोन करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही – सर्वोच्च न्यायालय*
*प्रकरण*
Dhirubhai Nanjibhai Patel Lotwala vs State of Gujarat & Anr.📌 सायटेशन : 2026 LiveLaw (SC) 270
4) *चंबळ अभयारण्यात बेकायदेशीर वाळू उत्खननावर सर्वोच्च न्यायालय गंभीर – अधिकाऱ्यांवर ‘Vicarious Liability’ची शक्यता*
* पर्यावरण व वन्यजीव संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका.*प्रशासनातील निष्क्रियतेवर थेट जबाबदारी निश्चित करण्याचा इशारा
*केस :* Illegal Sand Mining in the National Chambal Sanctuary
*5) न्यायालयीन निर्णयांवर टीका करणे चुकीचे नाही – सर्वोच्च न्यायालय*
अभिव्यक्ती स्वातंत्र्य व न्यायालयीन टीकेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका “Constructive criticism” ही लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचा पुनरुच्चार
*प्रकरण*
Pankaj Pushkar vs Union of India & Anr.
*6) भारताचे मुख्य न्यायाधीश यांनी आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत, मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवा अटी व कार्यकाळ) अधिनियम, 2023 विरोधातील याचिकांच्या सुनावणीतून स्वतःला अलिप्त (recuse) केले आहे.*
*केस तपशील:*
Dr. Jaya Thakur v. Union of India and connected cases
(W.P.(C) No. 14/2024, Diary No. 146/2024)
*7) वकीलाने न्यायालयात केलेले विधान नंतर “सूचना नव्हत्या” असे सांगून पक्षकार नाकारू शकत नाही. असे करण्याचा प्रयत्न हा* *“procedural heresy” असून* *न्यायप्रक्रियेचा दुरुपयोग आहे.*
*पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय*
*प्रकरणाची पार्श्वभूमी* :
याचिकाकर्त्याने आधी anticipatory bail अर्ज मागे घेतला होता. त्यावेळी वकिलाने न्यायालयात सांगितले की आरोपी 7 दिवसांत ट्रायल कोर्टात हजर होऊन नियमित जामीन मागेल.
नंतर याचिकाकर्त्याने दावा केला की वकिलाने सूचना न घेता हे विधान केले.
*केस तपशील:*
Ankit Rawal v. State of Haryana
*8) गर्भातील बाळाचा मृत्यू हा आईच्या मृत्यूपेक्षा वेगळा “अपघात” मानला जाईल.*
*त्यामुळे स्वतंत्र नुकसानभरपाई देणे आवश्यक*
अहलाबाद उच्च न्यायालय
*केस तपशील:*
Shri Sukhnandan vs. Union of India
Citation: 2026 LiveLaw (AB) 116
**9) पत्नी कमावती आहे हे एकमेव कारण देऊन तिचा maintenance (भरणपोषण) नाकारता येत नाही.*
*केस तपशील:*
Lalitkumar Jivrajbhai Vaghela v. State of Gujarat & Anr.
(R/Criminal Revision Application No. 283/2021)
*10) नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे.*
मध्यप्रदेश उच्च न्यायालय
केस तपशील:
Rameshchandra v. State of Madhya Pradesh
(CRR 4644 of 2025)
*संपादक ॲड सिद्धू महाडिक*
*मो 9372391409*
Post a Comment
0Comments