आमचा आवाज, आमचा हक्क!” — महिला वकिलांचा एल्गार; ॲड. प्रमोद भोकरे यांना ठाम पाठिंबा
सांगली: विशेष बातमी |
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील विधीज्ञांमध्ये विशेषतः महिला वकिलांमध्ये उत्साहाचे आणि आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घकाळापासून बार कौन्सिलमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व अपुरे राहिल्याची खंत व्यक्त होत असताना, आता त्या प्रतिनिधित्वासाठी ठोस पाऊल उचलण्याची वेळ आल्याची भावना महिला वकिलांमध्ये व्यक्त होत आहे.
कायद्याच्या क्षेत्रात महिलांनी आज मोठी झेप घेतली आहे. न्यायालयीन कामकाज, सामाजिक भान आणि व्यावसायिक कौशल्य या सर्व बाबींमध्ये महिलांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. मात्र, बार कौन्सिलसारख्या महत्त्वाच्या संस्थेत त्यांचे प्रतिनिधित्व मर्यादित राहिल्याने त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळत नसल्याची भावना अनेक वर्षे होती. या पार्श्वभूमीवर महिला वकिलांनी एकजुटीने पुढे येत आपला आवाज बुलंद करण्याचा निर्धार केला आहे.
याच अनुषंगाने सांगली जिल्ह्यातून ॲड. प्रमोद अंकुश भोकरे यांचे नाव ठळकपणे पुढे आले आहे. महिला वकिलांच्या प्रश्नांना संवेदनशीलतेने हाताळणारे, त्यांच्या सन्मानासाठी आणि हक्कांसाठी नेहमीच पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ॲड. भोकरे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महिला वकिलांनी त्यांना ठाम पाठिंबा जाहीर केला आहे.
सांगलीतील महिला वकिलांच्या या चळवळीला *ॲड. सीमा सुतार* यांचे प्रभावी नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन महिला वकिलांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. इतकेच नव्हे तर सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव आदी जिल्ह्यांमध्येही जाऊन त्यांनी प्रचाराचा विस्तार केला आहे. दिवस-रात्र परिश्रम घेत या रणरागिणींनी निवडणूक प्रचाराला वेगळी उंची दिली आहे.
*या संदर्भात बोलताना ॲड. सीमा सुतार यांनी सांगितले की,* “ॲड. प्रमोद भोकरे हे आमच्यासाठी केवळ उमेदवार नाहीत, तर आमच्या हक्कांसाठी लढणारे प्रतिनिधी आहेत. ते आमचे प्रश्न प्रभावीपणे मांडू शकतात आणि महिला वकिलांच्या सन्मानासाठी नक्कीच कार्य करतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
सांगलीतील अनेक ज्येष्ठ महिला विधीज्ञ — ॲड. सुजाता कदम, ॲड. सुनंदा पाटील, ॲड. संगीता गोसावी, ॲड. प्राची लेले, ॲड. कविता चव्हाण, ॲड. सोनाली हिरवे, ॲड. जयश्री भोजगे, ॲड. सुधा खेमलापूरे, ॲड. धनश्री केरीपाळे, ॲड. जुलेखा मुतवली, ॲड. स्वाती सूर्यवंशी, ॲड. अंकिता कराडे, ॲड. वंदना चिवटे, ॲड. ज्योती नामगोंडा आदींसह अनेक महिला वकिलांनीही प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सांगली जिल्ह्याला बार कौन्सिलमध्ये अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची भावना विधीज्ञांमध्ये होती. त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ एक निवडणूक नसून, जिल्ह्याचा आवाज बार कौन्सिलपर्यंत पोहोचवण्याची संधी म्हणून पाहिली जात आहे.
एकंदरीत, महिला वकिलांच्या ठाम पाठिंब्यामुळे ॲड. प्रमोद भोकरे यांची उमेदवारी अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. महिला सन्मान, हक्क आणि प्रतिनिधित्व या मुद्द्यांवर उभारलेला हा प्रचार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, येणाऱ्या निवडणुकीत त्याचा ठोस परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🗳️ बार कौन्सिल निवडणूक 2026 — बॅलेट क्रमांक 14
प्रथम पसंतीसाठी चर्चेत — ॲड. प्रमोद अंकुश भोकरे
✍️ न्याय विश्व साप्ताहिक
"न्याय, सन्मान आणि प्रतिनिधित्वासाठी कटिबद्ध!"
Post a Comment
0Comments