बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक
सांगलीतून ॲड. प्रमोद भोकरे यांचा उमेदवारी अर्ज जल्लोषात दाखल
सांगली | प्रतिनिधी
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या आगामी निवडणुकीसाठी सांगली येथील ज्येष्ठ वकील ॲड प्रमोद भोकरे यांनी मोठ्या जल्लोषात व उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सांगलीसह संपूर्ण परिसरातील वकिलांचा लक्षणीय पाठिंबा, घोषणाबाजी आणि सकारात्मक वातावरण अनुभवास आले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना ॲड. भोकरे यांनी विकासकेंद्रित आणि वकिलांच्या सर्वांगीण हिताला प्राधान्य देणारा अजेंडा मांडला. बार कौन्सिलमधील अनेक मूलभूत तसेच दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. वकिलांच्या दैनंदिन व्यावसायिक अडचणी, कल्याणकारी योजना, प्रशिक्षणाच्या संधी तसेच न्यायालयीन पायाभूत सुविधांबाबत व्यापक संवाद साधत त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
विशेषतः नवोदित वकिलांचे प्रश्न, न्यायालयीन पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, डिजिटल प्रणालींचे सुलभीकरण, कल्याण निधीची कार्यक्षम व पारदर्शक अंमलबजावणी तसेच वकिलांच्या सन्मान व सुरक्षिततेशी संबंधित मुद्द्यांवर सखोल अभ्यास करून ठोस धोरण राबविण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.
या निवडणुकीत संघटनात्मक बांधणी, मतदार संपर्क आणि मुद्देसूद प्रचारावर भर देत मोठ्या जोमाने लढण्याची रणनीती आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांतील वकिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेत त्यानुसार धोरणात्मक आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना
माननीय उच्च मुंबई न्यायालय येथील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुदत्त पाटील, ॲड. अभिनंदन व्यगाणी, ॲड. कुलदीप पाटील, ॲड. सुकुमार घनवट, ॲड. वीरा शिंदे, ॲड. आनंद सारनाथ, ॲड. विकास कोळेकर, ॲड. आरोह कुलकर्णी यांच्यासह सांगली वकील संघटनेतील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. फारूक मुजावर, ॲड सुभाष संकपाळ ॲड. एच. के. पाटील, ॲड. सुरेश भोसले, ॲड. राजेंद्र माने, ॲड. सचिन पाटील, ॲड. विजय मोहिते, ॲड. शिवाजी साळुंखे, ॲड. प्रमोद सुतार, ॲड. प्रवीण गोंधळे, ॲड. विक्रांत ऑर्डर, ॲड. सनी जमादार, ॲड. आमसिद्ध बिराजदार, ॲड. ठाणेदार आदी ज्येष्ठ विधीज्ञ उत्साहाने उपस्थित होते.
विजयाचा चौपर रस्ता सोफा
विधीज्ञांमध्ये ॲड. प्रमोद भोकरे यांच्या उमेदवारीबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू असून, त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे आणि स्पष्ट भूमिकेमुळे त्यांचा विजयाचा चौफेर रस्ता सोपा झाल्याची चर्चा मतदारांमध्ये होत आहे. एकूणच, विकास, पारदर्शकता आणि वकिलांच्या सर्वांगीण हिताला प्राधान्य देणारी सांगलीतून दाखल झालेली ॲड. प्रमोद भोकरे यांची उमेदवारी लक्षवेधी ठरत आहे.
Post a Comment
0Comments