१) *१४ वर्षांनंतर ८ वीचे शिक्षण पूर्ण करणे बेकायदेशीर नाही – हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय*
१४ वर्षांनंतर एखाद्या व्यक्तीने ८ वीचे शिक्षण पूर्ण केल्यास ते कायद्याविरुद्ध मानले जाऊ शकत नाही.
*प्रकरणाची माहिती*
*Case* : Pankaj Chauhan & Ors. v/s State of H.P. & Others
*Case No.:* CWP No. 20062 of 2025
२) *तडजोडीचा प्रयत्न झाला म्हणून FIR दाखल करण्यास पोलिसांना अडथळा नाही – सर्वोच्च न्यायालय*
पोलीसांनी वाद मिटवण्यासाठी तडजोड किंवा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असला तरी गुन्हा घडल्यास FIR नोंदविण्याचा त्यांचा अधिकार व कर्तव्य कमी होत नाही.
*प्रकरणाची माहिती*
*Case:* Kuldeep Singh & Anr. v. State of Punjab & Anr.
*Citation:* 2026 LiveLaw (SC) 239
३) *“Industry” या संज्ञेच्या व्यापक व्याख्येचा पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात ९ न्यायमूर्तींचे संविधान पीठ*
माननीय सर्वोच्च न्यायालयाने “industry” या संज्ञेच्या व्याख्येचा पुनर्विचार करण्यासाठी ९ न्यायमूर्तींचे संविधान पीठ (Constitution Bench) स्थापन केले आहे.
*प्रकरणाची माहिती*
*Case* : State of U.P. v. Jai Bir Singh
*Case No* .: Civil Appeal No. 897 of 2002
४) *बार असोसिएशनमध्ये ३०% महिला प्रतिनिधित्वासाठी जिल्हा न्यायाधीशांना महिलांची नामनिर्देशन करण्याचा अधिकार – सर्वोच्च न्यायालय*
माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील बार असोसिएशनच्या कार्यकारिणीत (Executive Committee / Governing Body) किमान ३०% महिला प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचा आदेश दिला आहे.
*प्रकरणाची माहिती*
*Case:* Deeksha N. Amruthesh v. State of Karnataka & Others
*Case No* .: SLP (Civil) No. 1404 of 2025
५) *ममता बॅनर्जी मानहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा ‘स्टेटस क्वो’ आदेश*
माननीय सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संबंधित मानहानी प्रकरणात महत्त्वाचा अंतरिम आदेश देत स्टेटस क्वो कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
*प्रकरणाची माहिती*
*Case:* Koustav Bagchi v. State of West Bengal
*Case No* .: Diary No. 14612 of 2026
६) *रेल्वे कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणात कुटुंबाला न्यायालयात फिरवू नका – मुंबई उच्च न्यायालय*
रेल्वे कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना न्यायालय किंवा ट्रिब्युनलकडे धाव घ्यावी लागू नये; रेल्वे प्रशासनाने स्वतःहून कागदपत्रांची तपासणी करून भरपाई द्यावी.
*प्रकरणाची माहिती*
*Case* : Nagmani Ramnna Burumuri v. Union of India
*Case No* .: First Appeal No. 739 of 2016
७) *मतदानाच्या दिवशी ‘स्टार कॅम्पेनर’ची भेट म्हणजेच ‘अनुचित प्रभाव’ नाही – मुंबई उच्च न्यायालय*
मतदानाच्या दिवशी एखाद्या ‘स्टार कॅम्पेनर’ने मतदारसंघाला भेट देणे किंवा रोड शो करणे हे आपोआपच “अनुचित प्रभाव” (Undue Influence) किंवा “भ्रष्ट आचरण” (Corrupt Practice) ठरत नाही.
*Case:* Md Arif Lalan Khan alias Naseem Khan v. Dilip Bhausaheb Lande
*Case No.:* Election Petition No. 9 of 2025
८) *क्रॉस-एग्झामिनेशन वेळी साक्षीदारासमोर कागदपत्र दाखवण्यासाठी वेगळा अर्ज आवश्यक नाही – मुंबई उच्च न्यायालय*
साक्षीदाराच्या उलटतपासणी दरम्यान (Cross-Examination) त्याला विरोधाभास दाखवण्यासाठी किंवा आठवण ताजी करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही, जर ती कागदपत्रे प्रकरणातील मुद्द्यांशी संबंधित असतील.
*Case* : Jijabhau Dyaneshwar Temgire v. Gangaram Khandu Temgire & Others
*Case No* .: Writ Petition No. 8080 of 2022
९) *कोल्हापूर सर्किट बेंच सुरू झाल्यामुळे मुंबई प्रिन्सिपल सीटचे अधिकार आपोआप संपत नाहीत – मुंबई उच्च न्यायालय*
कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन झाल्यामुळे मुंबई येथील प्रिन्सिपल सीटचे अधिकार आपोआप संपत नाहीत, विशेषतः जेव्हा अपील अथवा आदेश देणारी प्राधिकरणे मुंबईच्या अधिकारक्षेत्रात असतात.
*Case* : Shekhar Champalal Pagaria & Ors. v. CFM Assets Reconstruction Pvt. Ltd. & Ors.
*Case No* .: Writ Petition No. 10011 of 2025
१०) *सिव्हिल सूट प्रलंबित असला तरी ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ देण्यास अडथळा नाही – मुंबई उच्च न्यायालय*
बांधकामातील अनियमितता किंवा प्रमोटरांमधील वादांबाबत सिव्हिल सूट प्रलंबित असल्यामुळे डीम्ड कन्व्हेयन्स (Deemed Conveyance) देण्यास अडथळा येत नाही.
*प्रकरणाची माहिती*
*Case:* Quantum Park Cooperative Housing Society Limited v. AHCL-PEL & Ors.
*Case No* .: Writ Petition No. 10220 of 2025
✍️ *ॲड. सिद्धू महाडिक*
*संपादक – न्याय विश्व साप्ताहिक*
*मो. ९३७२३९१४०९*
Post a Comment
0Comments