न्याय विश्व
ब्रेकिंग न्यूज 20/03/2026
*1) बँक ठेवींवरील व्याज मिळाले म्हणून व्यवहार ‘Commercial’ ठरत नाही – सर्वोच्च न्यायालय*
केस: Sant Rohidas Leather Industries v Vijaya Bank
साईटेशन: 2026 LiveLaw (SC) 267
*2) निवृत्तीनंतरही शिस्तभंग कारवाई सुरू ठेवता येते – सर्वोच्च न्यायालय*
सेवा नियम (Service Rules) परवानगी देत असतील तर, निवृत्तीपूर्वी सुरू केलेली शिस्तभंग कारवाई (disciplinary proceedings) निवृत्तीनंतरही सुरू ठेवता येते.
केस: Virinder Pal Singh v Punjab and Sind Bank
साईटेशन: 2026 LiveLaw (SC) 268
*3) पोस्ट-डेटेड चेक बाउन्स म्हणजेच ‘चीटिंग’ नाही – सर्वोच्च न्यायालय*
*काय म्हणाले न्यायालय?*
फसवणूक ठरवण्यासाठी सुरुवातीपासूनच (inception) फसवणुकीचा हेतू (dishonest intention) असणे आवश्यक आहे.
केवळ नंतर दिलेला शब्द पाळला नाही किंवा व्यवहार फसला म्हणून गुन्हा ठरत नाही.
पोस्ट-डेटेड चेक हे बहुतांश वेळा कर्जफेड किंवा सिक्युरिटीसाठी दिले जातात.
त्यामुळे,
चेक बाउन्स झाला म्हणजे फसवणूक असा सरळ निष्कर्ष काढता येत नाही.
*केस:* V Ganesan v State
*साईटेशन* : 2026 LiveLaw (SC) 269
*4) युट्युबर एलविश यादव विरुद्ध सापाच्या विष प्रकरणात FIR रद्द – सर्वोच्च न्यायालय*
*प्रकरण काय होते?*
आरोप - व्हिडिओ शूटसाठी सापाचे विष वापरणे.
रेव पार्टीमध्ये ड्रग्स वापर व पुरवठ्याचा आरोप
NDPS Act, Wildlife Protection Act आणि IPC अंतर्गत गुन्हे दाखल.
*न्यायालयाचे निरीक्षण*
कथित पदार्थ NDPS Act च्या Schedule मध्ये नाही
यामुळे NDPS Act लागू होत नाही
शिवाय: कोणतीही थेट जप्ती (recovery) नाही.
*केस:* Elvish Yadav v State of Uttar Pradesh
*केस क्रमांक*: SLP (Crl) No. 11480/2025
*5) कंपनी क्वार्टर रिकामे न केल्यास ग्रॅच्युइटी रोखता येते – सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय*
*केस:* SAIL v Shambhu Prasad Singh
*साईटेशन:* 2026 LiveLaw (SC) 262
*6) परदेशी आरोपीच्या अटकेची माहिती नातेवाईकांना देणे आवश्यक नाही – केरळ उच्च न्यायालय*
मात्र ती माहिती FRRO किंवा संबंधित देशाच्या दूतावासाला (Embassy/Consulate) दिली असल्यास कायद्याची पूर्तता मानली जाईल.
*केस:* Abdul Hamid Makame v State of Kerala
*साईटेशन*: 2026 LiveLaw (Ker) 158
7) 17 वर्षांच्या विलंबामुळे शिक्षा कमी, पण दोष कायम – कलकत्ता उच्च न्यायालय*
केस: Palas Dolui v State of West Bengal
केस क्रमांक: C.R.A. 497 of 2010
8) प्रोबेट प्रकरणात मालमत्तेच्या मालकीचा वाद चालत नाही – मुंबई उच्च न्यायालय*
*महत्त्वाचा निष्कर्ष*
जर कोणी म्हणत असेल की:
“मृत्युपत्र (वसीयत) करणाऱ्यालाच मालमत्ता देण्याचा अधिकार नव्हता”
तर हा वाद सिव्हिल कोर्टात वेगळ्या खटल्यात सोडवावा लागतो.
*केस:* Sunil Waman Bhide v Chandrahas Laxman Kanhere
*साईटेशन:* 2026 LiveLaw (Bom) 114
09) दाव्याचे मूळ कारणच संपले तर खटला संपवणे आवश्यक : मुंबई उच्च न्यायालय*
*महत्त्वाचे मुद्दे*
फक्त interim order (तात्पुरता आदेश) टिकवण्यासाठी खटला चालू ठेवता येत नाही.
भविष्यात काही दावा करता येईल या अंदाजावर खटला जिवंत ठेवता येत नाही.
*केस:* Union of India v Maheshkumar Gordhandas Garodia
*साईटेशन:* 2026 LiveLaw (Bom) 116
*10) “Plaint मध्ये cause of action आहे की नाही हे evidence नंतरच ठरवता येते” :मुंबई उच्च न्यायालय*
न्यायालयानेवस्पष्ट केले आहे की,
Improper joinder of causes of action हा मुद्दा ‘triable issue’ आहे
त्यामुळे Order VII Rule 11 CPC अंतर्गत plaint reject करता येत नाही.
*केस:* Victoria Enterprises Limited v DNM Trustee Service Private Ltd
*साईटेशन*: 2026 LiveLaw (Bom) 112
11) FIR रद्द याचिकेत “अनावश्यक मागण्या” करून तपासावर दबाव टाकू नका – उत्तराखंड उच्च न्यायालयाचा इशारा*
संपादक- ॲड सिद्धू महाडिक सांगली
मो 9372391409
(टीप- आपणास ब्रेकिंग न्यूज किंवा कायदेशीर माहिती संदर्भात काही अडचण, शंका किंवा अधिक माहिती हवी असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधावा.
आपले मार्गदर्शन व अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.)
Post a Comment
0Comments