मुंबई :न्याय विश्व साप्ताहिक
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या 2026 च्या निवडणुकीसंदर्भात मतदार वकिलांसाठी महत्त्वाच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी मतदान 24 मार्च 2026 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत होणार आहे.
या निवडणुकीत एकूण 23 सदस्यांची निवड करण्यात येणार असून त्यापैकी 5 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
मतदान Single Transferable Vote (STV) या प्राधान्यक्रम पद्धतीने होणार आहे. Bar Council of India च्या नियमांनुसार प्रत्येक मतदाराने किमान 5 प्राधान्यक्रम (Preference) देणे बंधनकारक आहे.
जर मतदाराने मतपत्रिकेत 5 पेक्षा कमी प्राधान्यक्रम दिले, तर ती मतपत्रिका अवैध (Invalid) ठरविण्यात येणार आहे. मतदारांना किमान 5 आणि जास्तीत जास्त 23 पर्यंत प्राधान्यक्रम देण्याची मुभा आहे.
मतदान करताना पहिल्या पसंतीसाठी ‘1’ हा क्रमांक एका उमेदवारासमोर स्पष्टपणे लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर इच्छेनुसार 2, 3, 4, 5… अशा पुढील पसंती क्रमांक देऊ शकतात.
बार कौन्सिलने सर्व वकिलांना मतदान करताना या सूचनांचे पालन करून मतपत्रिका अवैध होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
Post a Comment
0Comments