कोल्हापुरात विवेकानंद कॉलेजमध्ये ‘AI व संशोधन कौशल्य’ कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी):
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर अंतर्गत विवेकानंद कॉलेजमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संशोधन कौशल्ये विकसित करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
IQAC व भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने
करण्यात आले. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कॉलेजच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वापर, आधुनिक तंत्रज्ञानाची गरज, तसेच संशोधनातील नवनवीन पद्धती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या राष्ट्रीय कार्यशाळेत ‘AI Tools for Research Reviews and Publications’ या विषयावर Dr. M. Sadik Batcha यांनी अत्यंत प्रभावी व मार्गदर्शक व्याख्यान दिले. संशोधन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा उपयोग कसा करावा यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनातील प्रमुख मुद्दे
▪️ AI टूल्समुळे संशोधन प्रक्रिया अधिक जलद व सोपी होते
▪️ “Paper Digest” सारख्या टूल्सद्वारे संशोधन लेखांचा झटपट सारांश मिळू शकतो
▪️ कोणताही संशोधन पेपर समजून घेण्यासाठी AI मदत करते
▪️ “Explain Paper” टूलद्वारे PDF अपलोड करून संपूर्ण पेपर सोप्या भाषेत समजावून घेत येतो
▪️ वेळ वाचवण्यासाठी पूर्ण पेपर वाचण्याऐवजी AI आधारित विश्लेषण उपयुक्त
▪️ “Wordtune Read” टूलद्वारे महत्त्वाच्या ओळींचा संक्षेप मिळतो
▪️ संबंधित संशोधन (literature review) शोधणे अधिक सुलभ
▪️ मोठे परिच्छेद अर्थ न बदलता लहान करता येतात (rewrite feature)
▪️ संशोधनात गुणवत्ता वाढवण्यासाठी AI चा योग्य वापर आवश्यक
▪️ AI चा वापर करताना शैक्षणिक प्रामाणिकपणा राखणे गरजेचे
डॉ. बाचा यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून संशोधनात उत्कृष्टता साध्य करण्याचे आवाहन केले. AI हे फक्त साधन असून त्याचा वापर जबाबदारीने करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाच्या नव्या दिशा मिळाल्या असून, भविष्यात AI च्या साहाय्याने अधिक गुणवत्तापूर्ण संशोधन घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी बी पाटील सर केंद्र संयोजक डॉ
सुनील भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते .
तर प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना AI चा योग्य व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलामान्यवरांचे स्वागत करण्यात आले, तर शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा मिळून त्यांच्या संशोधन क्षमतेत निश्चितच भर पडणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Post a Comment
0Comments