मुंबई | प्रतिनिधी | न्यायविश्व साप्ताहिक
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा (Bar Council of Maharashtra & Goa) निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर करण्यात आला असून, एकूण १८ सदस्यांसह ५ महिला उमेदवारांची निवड घोषित करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिनांक ६ जून २०२६ रोजी अधिकृत निकाल प्रसिद्ध केला.
या निवडणुकीत राज्यभरातील विविध बार असोसिएशनमधील उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. अंतिम निकालानंतर अनेक दिग्गज उमेदवारांनी विजय मिळवला, तर काही उमेदवारांना अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
निवडून आलेले प्रमुख सदस्य
जाहीर झालेल्या निकालानुसार
१) श्री. पांडे परिजात मधुसूदन,
२) श्री. शिरसाट गणेश बापूसाहेब,
३)श्री. उमाप राजेंद्र बाबुराव,
४)श्री. देशमुख आशीष पंजराव,
५) श्री. थोबडे मिलिंद शिवशंकर,
६) श्री. देसाई संग्राम दत्तात्रय,
७) श्री. जयभावे जयंत दत्तात्रय,
८) श्री. कोंडेदेशमुख विठ्ठल भाऊराव,
९) श्री. अंभुळे राजेंद्र दत्तात्रय,
१०)श्री. वरुंजीकर उदय प्रकाश,
११) श्री. चव्हाण गजानन बाबाजी,
१२)श्री. साळुंखे वसंत दिगंबरराव,
१३) श्री. धागे पाटील विकास विठ्ठलराव,
१४)श्री. देशमुख सतीश अबाराव,
१५)श्री. बागुल ज्ञानेश्वर सुरेश,
१६)श्री. घाटगे विवेकानंद नाईकराव,
१७) श्री. कुरेशी आसिफ शौकत आणि
१८)श्री. पठाण अहमदखान उस्मानखान
यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.
महिला उमेदवारांनाही प्रतिनिधित्व
महिला आरक्षणाच्या जागांवर
१) सौ. रंजना रघुनाथ भोसले,
२) सौ. क्षितिजा वानखेडे वाडतकर,
३) सौ. अनिता शेखर कॅस्टेलिनो,
४)सौ. माधवी बाळ पोतदार आणि
५) सौ. उमा अनिल भट्टड
यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
काही निकालांवर आक्षेप कायम
निकालपत्रामध्ये उमेदवार क्रमांक ११० श्री. आसिफ शौकत कुरेशी यांच्या निवडीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या आक्षेपावर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याची नोंदही करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणावरील निर्णयानंतर आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
चुरशीची लढत; अनेक उमेदवारांनी दाखवली ताकद
यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. अनेक उमेदवारांनी राज्यभर व्यापक जनसंपर्क साधत वकिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. काही उमेदवारांना अत्यल्प मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला असला, तरी त्यांनी निर्माण केलेला जनाधार आणि मिळवलेले समर्थन भविष्यातील नेतृत्वासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ही राज्यातील वकिलांच्या हिताचे प्रश्न, व्यावसायिक आचारसंहिता, कायदेविषयक धोरणे आणि अधिवक्त्यांच्या कल्याणाशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी संस्था असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण विधी क्षेत्राचे लक्ष लागले होते.
नवीन निवडून आलेल्या सदस्यांकडून वकिलांच्या समस्या सोडविणे, न्यायव्यवस्थेची गुणवत्ता उंचावणे आणि बार व बेंच यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी प्रभावी भूमिका बजावली जाईल, अशी अपेक्षा राज्यभरातील अधिवक्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Post a Comment
0Comments