भावना, प्रेरणा आणि सन्मानाचा संगम:
वाढदिवस सोहळा उत्साहात
सांगली : प्रतिनिधी
सांगली वकील संघटनेतील ॲड. सिद्धू महाडीक आणि ॲड. काशीम शेख यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ विधिज्ञांनी आयोजित केलेला स्नेहमेळावा भावनिक आठवणी, प्रेरaणादायी विचार आणि शुभेच्छांच्या वर्षावात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास ज्येष्ठ विधिज्ञ तथा माजी न्यायाधीश ॲड. फारूक कोतवाल, सहायक सरकारी वकील ॲड. शकील पखाली, ॲड. राजेंद्र माने, ॲड. सुरेंद्र शेटे, ॲड. शिवाजी कांबळे, ॲड. समशुद्दीन सनदी, ॲड. हिरालाल धुमाळ, ॲड. बिलकीस शेख, ॲड. मानसी भोसले, ॲड. स्वाती सूर्यवंशी, ॲड. नवीनचंद्र कोठावळे, ॲड. गौतम जतकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ विधिज्ञ तथा माजी न्यायाधीश ॲड. फारूक कोतवाल यांनी भावनिक आठवणींना उजाळा दिला. “ॲड. सिद्धू महाडीक हा माझा विद्यार्थी असून २००४ -०५ साली आलेल्या भीषण महापुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून एका मुलीचे प्राण वाचविण्याचे धाडस त्याने केले होते. त्याचे हे सामाजिक भान आणि सेवाभाव आजही प्रेरणा देणारे आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना भारावून टाकले.
याचबरोबर त्यांनी ‘न्याय विश्व’ साप्ताहिकाचे विशेष कौतुक करताना, कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्यायव्यवस्थेची माहिती सोप्या भाषेत पोहोचविणारे हे एक प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. भविष्यात या साप्ताहिकाने अधिक व्यापक कार्य करावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
सहायक सरकारी वकील ॲड. शकील पखाली यांनी ॲड. सिद्धू महाडीक यांच्या नम्र, मनमिळावू आणि आदरयुक्त स्वभावाचा विशेष उल्लेख केला. “लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाशी सन्मानाने वागणे ही त्यांची ओळख आहे,” असे सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेंद्र माने यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात वकिली व्यवसाय हा चिकाटी, संयम आणि सातत्याची कसोटी पाहणारा व्यवसाय असल्याचे सांगितले. संयम राखून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा मोलाचा संदेश देत त्यांनी दोन्ही वाढदिवस साजरा करणाऱ्या वकिलांना शुभेच्छा दिल्या.
ॲड कासिम शेख हे प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व असलेन त्यांचा कार्याचा गौरवही अनेक मान्यवरांनी केले.
ॲड. हिरालाल धुमाळ यांनी आपल्या प्रभावी आणि ओजस्वी भाषणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले,
तर ॲड. शिवाजी कांबळे यांनी ‘न्याय विश्व’ साप्ताहिकाच्या कार्याचे कौतुक करत हे व्यासपीठ नवोदित वकिलांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी कायद्याची माहिती देणारे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित सर्व मान्यवरांनी उत्साहपूर्ण वातावरणात ॲड. सिद्धू महाडीक आणि ॲड. काशीम शेख यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. भावनिक आठवणी, प्रेरणादायी विचार आणि स्नेहभावनेने ओतप्रोत भरलेला हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
सदर कार्यक्रमातील काही क्षणचित्रे..
Post a Comment
0Comments