उमदी पंचक्रोशीतील देवदूत : सेवाभावातून उभं राहिलेलं एक प्रेरणादायी नेतृत्व
सांगली: न्याय विश्व प्रतिनिधी
(न्यायविश्व साप्ताहिक विशेष बातमी)
सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे कायम दुष्काळाची छाया असलेला, महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील दुर्गम भूभाग. उमदी व पंचक्रोशीतील अनेक गावे, वाड्या-वस्त्या आजही मूलभूत वैद्यकीय सुविधांपासून दूर आहेत. चांगला उपचारासाठी रुग्णांना शे दोनशे किलोमीटरचा प्रवास नेहमीच करावा लागतो मात्र माफक दरात दर्जेदार उपचार मिळतील याची खात्री नव्हती.
अशा परिस्थितीत डॉ. राहुल पाटील यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आशेचा किरण निर्माण केला. उमदी व पंचक्रोशीतील नागरिकांना माफक दरात, विश्वासार्ह आणि सुलभ वैद्यकीय सेवा देण्याचा त्यांनी ध्यास घेतला. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले व अपंग व्यक्तींसाठी घरपोच सेवा देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो—तोही परवडणाऱ्या दरात.
जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे अनेकांना परवडत नसल्याने, नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांना उमदीतील रुग्णालयात बोलावून स्थानिक पातळीवरच उपचार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. गंभीर व तातडीच्या रुग्णांसाठी वेळेवर मदत मिळावी म्हणून त्यांनी स्वखर्चाने ॲम्बुलन्स सेवाही सुरू केली—अनेकांचे प्राण वाचवणारा हा निर्णय ठरला.
कोरोनाच्या कठीण काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले—ही सेवा कधीही न विसरण्यासारखी आहे. मितभाषी, नम्र, प्रत्येकाशी आदराने वागणारे आणि जनहित नेहमी अग्रक्रमावर ठेवणारे हे व्यक्तिमत्त्व आज उमदी पंचक्रोशीसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरले आहे.
आज अशा थोर सेवाभावी व्यक्तीचा वाढदिवस.
त्यांची सेवा अखंड राहो, आरोग्य व यश त्यांच्या पावलांशी राहो, आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे नाव उज्ज्वल होवो—
न्यायविश्व साप्ताहिकाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Post a Comment
0Comments