दिग्दर्शक अभिनव कश्यप व युट्युब चॅनलविरोधात ad-interim ex-parte injunction
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अपमानास्पद भाषेला संरक्षण नाही – न्यायालय
मुंबई (दि. 30 जानेवारी):
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात कथित बदनामीकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी मुंबई सिव्हिल कोर्टाने दिग्दर्शक अभिनव कश्यप तसेच “Bollywood Thikana” या युट्युब चॅनलशी संबंधित दोन व्यक्तींना कोणतेही बदनामीकारक विधान प्रसारित, पोस्ट किंवा प्रसार करण्यास तात्पुरती मनाई केली आहे.
ही कारवाई न्या. पांडुरंग भोसले यांच्या न्यायालयाने, सलमान खान यांनी तातडीने दाखल केलेल्या दिवाणी अर्जावर सुनावणी करताना केली.
न्यायालयाचे ठोस निरीक्षण
न्यायालयाने अभिनव कश्यप यांच्या मुलाखतीतील विधानांचा अभ्यास करून स्पष्ट केले की —
“प्रथमदर्शनी ही विधाने बदनामीकारक, अपमानास्पद, अवमानकारक व निंदनीय स्वरूपाची आहेत. या विधानांमुळे फिर्यादीची सर्वसामान्य लोकांमधील प्रतिमा मलीन होते व त्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो.”
न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की,
“कोणालाही कोणाच्याही कुटुंबाविरोधात बदनामीकारक विधान करण्याचा अधिकार नाही.”
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर स्पष्ट मर्यादा
अभिनव कश्यप यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा (Article 19(1)(a)) मुद्दा उपस्थित केला असता, न्यायालयाने तो ठामपणे फेटाळला.
“अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही व्यक्तीविरोधात अपमानास्पद, शिवीगाळ करणारी किंवा धमकीची भाषा वापरण्याचा अधिकार नव्हे. प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा व गोपनीयता संरक्षित असली पाहिजे,” असे न्यायालयाने नमूद केले.
Ad-Interim Ex-Parte आदेश
न्यायालयाने हा योग्य मामला असल्याचे नमूद करत पुढील आदेश दिले —
प्रतिवादींना कोणतेही व्हिडिओ, पोस्ट, मुलाखती, संदेश, ट्विट्स, लेखन, अपलोड, री-पोस्ट, प्रसारण किंवा पुनःप्रसारण करण्यास मनाई
सलमान खान किंवा त्यांच्या कुटुंबासंदर्भात कोणतेही बदनामीकारक, अवमानकारक किंवा निंदनीय मजकूर प्रसिद्ध करण्यास बंदी
सर्व प्रतिवादी न्यायालयात हजर होऊन उत्तर दाखल करेपर्यंत ही मनाई लागू राहणार
फिर्यादीने हा आदेश सर्व प्रतिवादींना कळवायचा
प्रकरणाची पार्श्वभूमी
अभिनव कश्यप यांनी Bollywood Thikana या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सलमान खान व त्यांच्या कुटुंबाविरोधात आक्षेपार्ह विधाने केली
चॅनलच्या मालक खुशबू हजारे व कोमल मेहरू यांनी ही मुलाखत प्रसारित केली
यामुळे आपली सामाजिक प्रतिमा व प्रतिष्ठा गंभीरपणे डागाळल्याचा दावा करत सलमान खान यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेतली
कायमस्वरूपी स्थगिती (Permanent Injunction) देण्याचीही मागणी केली आहे
वकिलांची ण
Post a Comment
0Comments