🟥 “सांगलीत भोकरे लाट उसळली!”
सांगली: विशेष वृत्त
ज्येष्ठ विधीज्ञांचा एकमुखी पाठिंबा; प्रथम पसंतीच्या मतासाठी जोरदार हाक
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली वकील संघटनेत पार पडलेली ॲड. प्रमोद भोकरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा ऐतिहासिक ठरली असून, या सभेत उमटलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ज्येष्ठ विधीज्ञांचा एकमुखी पाठिंबा यामुळे सांगलीत “भोकरे लाट” निर्माण झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
सभेला वकील संघटनेतील ज्येष्ठ विधीज्ञ, माजी पदाधिकारी, विविध बारचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते. संपूर्ण सभागृहात उत्साह, आत्मविश्वास आणि बदलाची चाहूल स्पष्ट जाणवत होती.
“मक्तेदारी संपवायची असेल तर भोकरे यांनाच मत द्या” – ॲड. एच. के. पाटील
सभेत ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एच. के. पाटील यांच्या प्रभावी भाषणाने झाली. त्यांनी ही निवडणूक वर्चस्वाची नसून प्रतिनिधित्वाची असल्याचे स्पष्ट करत, “गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली मक्तेदारी संपवायची असेल, तर ॲड. प्रमोद भोकरे यांनाच प्रथम पसंतीचे मत द्या,” असे ठाम आवाहन केले. जिल्ह्याच्या सन्मानासाठी स्थानिक सक्षम नेतृत्वाला संधी देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राज्यभरातून वाढता प्रतिसाद; सक्षम नेतृत्व म्हणून भोकरे – ॲड. प्रमोद सुतार
फौजदारी क्षेत्रातील नामांकित वकील ॲड. प्रमोद सुतार यांनी भोकरे यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, भोकरे यांना संपूर्ण महाराष्ट्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. बार-बेंच संबंधांची सखोल जाण, विविध पदांवरील अनुभव, संघटन कौशल्य आणि वकिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडण्याची क्षमता यामुळे ते सक्षम उमेदवार ठरतात. “हस्त-खेळतं प्रतिनिधित्व” ही त्यांची ओळख असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ विधीज्ञांचा ठाम पाठींबा
सभेत अनेक ज्येष्ठ विधीज्ञांनी भोकरे यांच्या उमेदवारीस ठाम समर्थन दर्शवले.
ॲड.अभिजीत सोनी यांनी खंडपीठाला विरोध करणाऱ्यांना पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट करत भोकरे यांच्या बाजूने भूमिका घेतली.
ॲड. फारुख कोतवाल यांनी भोकरे यांनी विविध पदांवर यशस्वीपणे काम केले असून कोणतेही पद सक्षमपणे सांभाळण्याची त्यांची क्षमता असल्याचे सांगितले.
माजी अध्यक्ष ॲड. भाऊसाहेब पवार यांनी भोकरे यांना निःस्वार्थी, धाडसी व वकिलांच्या प्रश्नांसाठी झटणारे नेतृत्व असे संबोधले.
“सांगलीचा ढाण्या वाघ” – ॲड. सुनील दोशी
ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुनील दोशी यांनी आपल्या भाषणात भोकरे यांना “सांगलीचा ढाण्या वाघ” अशी उपमा देत त्यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले. त्यांनी वकील संघटनेतील सर्व सदस्यांना प्रथम पसंतीचे मत भोकरे यांनाच देण्याचे भावनिक आवाहन केले.
ॲड प्रकाश साळुंखे यांनी मतदारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार निवडण्याचे आवाहन केले.
ॲड. रियाज जमादार याने अनेक शेर शायरी मधून ॲड प्रमोद भोकरे हे सक्षम नेतृत्व असल्याचे सांगून सभेमध्ये उत्साह निर्माण केला.
ॲड. उदगाव ॲड यादवाडे अनेक मान्यवराने ॲड प्रमोद भोकरे यांची उमेदवारी सर्वसमावेशक असल्याचे सांगितल
महिला विधीज्ञांचाही पाठिंबा
सांगली वकील संघटनेतील ज्येष्ठविधीज्ञ फौजदारी न्यायालयातील प्रसिद्ध कायदे तज्ञ ॲड सविता शेडबाळे यांनी भोकरे हे संघटनेतील सक्रिय व अभ्यासू नेतृत्व असून जिल्ह्याचे प्रभावी प्रतिनिधित्व करण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे नमूद केले.
ॲड. रोहिणी आपटे व ॲड. सुनंदा पाटील अनेक महिला ज्येष्ठ वाकलानी भोकरे यांच्या उमेदवारीस ठाम समर्थन दर्शवले.
संघर्षशील नेतृत्वाची झलक – ॲड. विशाल कुंभार
विटा बारचे ॲड. विशाल कुंभार यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या वेळी ॲड. भोकरे यांचे फार मोठे योगदान लाभलेचे. “जिल्हा सरकारी वकील असताना देखील त्यांनी पदाचा मोह न ठेवता वकिलांच्या न्यायासाठी लढा दिला,” पोलीस अधीक्षकांसमोरही त्यांनी “मी जिल्हा सरकारी वकील असतानाही, वकिलांच्या हक्कासाठी आलो आहे” असे ठणकावून सांगितल्याची आठवण त्यांनी करून दिली.
निर्णयक्षम व धाडसी नेतृत्व – ॲड. अशोकराव वाघमोडे
सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. अशोकराव वाघमोडे यांनी भोकरे यांच्या संघटन कौशल्याचा व निर्णयक्षमतेचा विशेष उल्लेख केला. “वकिलांच्या हक्कासाठी व मान-सन्मानासाठी त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत,” असे सांगत त्यांनी भोकरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
“मी तुमच्यातीलच आहे” – ॲड. प्रमोद भोकरे यांचे भावनिक मनोगत
सभेच्या शेवटी स्वतः ॲड. प्रमोद भोकरे यांनी अत्यंत भावनिक भाषण केले. त्यांनी सांगली वकील संघटनेने दिलेल्या संस्कारांची आठवण करून देत आपला संघर्षमय प्रवास मांडला.
“मी तुमच्यातीलच आहे, तुमच्यासाठीच लढत आहे,” असे सांगत त्यांनी वकील बांधवांशी भावनिक नाते व्यक्त केले.
निवडून आल्यास सांगलीत भव्य व आधुनिक वकील भवन उभारण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. इतर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्हा वकील संघटना करिता काम करण्याचं सांगितलं.
एकंदरीत चित्र काय सांगते?
सभेत उमटलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, ज्येष्ठ विधीज्ञांचा ठाम पाठिंबा, महिला वकीलांचा सहभाग आणि राज्यभरातून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद यामुळे ॲड. प्रमोद भोकरे यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाले आहे. सांगलीत निर्माण झालेले वातावरण पाहता, येत्या निवडणुकीत भोकरे यांचे पारडे जड असल्याची चर्चा वकील वर्तुळात रंगू लागली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. हजारे यांनी केले, तर ॲड. सचिन पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. सदर प्रसंगी ॲड. सुरेश भोसले, ॲड. राजेंद्र माने, ॲड.मनोज भोसले ॲड शितल मदवाने ॲड राजाराम यमगर ॲड सतीश माळी ॲड तोडकर ॲड प्रकाश लोखंडे ॲड पल्लवी कांते ॲड सुनिता मोहिते यांच्यासह अनेक ज्येष्ठविधीज्ञ सदर कार्यक्रमास हजर होते.
👉 “भोकरे लाट” आता सांगलीपुरती मर्यादित न राहता राज्यभर पोहोचणार का? याकडे संपूर्ण वकील वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
0Comments