क्राईम कॅपिटलचा मार्ग थांबवा – जागे व्हा, सांगली सुरक्षित करा! 🔥
सांगली : विशेष प्रतिनिधी
सांगलीत घडलेल्या घटनांनी सर्वांचं मन हादरवलं आहे – एका दिवसात तीन खून, ही गंभीर आणि चिंतेची बाब समाजासमोर आली आहे. ‘नव्याचे नऊ दिवस’ कारवाई, बातम्यांचे टोकण – पण परिस्थिती अजूनही जैसे थे. शहरातील काही भाग आता डार्क स्पॉट्स बनले आहेत, जिथे गुन्हेगारी वाढत आहे, आणि ठोस उपाययोजना कागदावरच मर्यादित आहेत.
लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन केले आहे की, सांगलीला ‘क्राईम कॅपिटल’ बनण्यापासून वाचवण्यासाठी आता त्वरित पावले उचलली पाहिजेत. फक्त प्रसिद्धीसाठी नाही, तर कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी उपाययोजना आवश्यक आहेत.
मनोज भिसे म्हणतात, “शांत बसण्याची वेळ संपली आहे. पक्ष-भेद विसरून, सुरक्षित सांगलीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या वाढत्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा.”
लोकहित मंचाचे आव्हान
नागरिक सजग व्हावेत.
स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.
वाढत्या गुन्हेगारीविरोधात एकत्रित आवाज उठवावा.
जागे व्हा... आपली सांगली सुरक्षित करा! 🙏
Post a Comment
0Comments