🗳️ बार कौन्सिल निवडणूक 2026
ॲड.प्रमोद भोकरे यांच्या प्रचारार्थ मराठवाड्यात झंजावाती दौरा
⚖️ न्यायविश्व साप्ताहिक | विशेष बातमी
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रमोद अंकुश भोकरे यांच्या उमेदवारीस जोरदार प्रतिसाद मिळत असून मराठवाडा विभागात त्यांच्या समर्थनार्थ प्रभावी प्रचार मोहीम राबविण्यात आली.
ॲड. प्रमोद भोकरे यांचे खंदे समर्थक ॲड. संतोष मधाळे व ॲड. प्रकाश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची धुरा सांभाळण्यात आली. त्यांच्या सोबत ॲड. राजाराम यमगर, ॲड.मुनीरखान मगदूम, ॲड. राहुल खोत, ॲड. रत्नेश जोशी आदींच्या टीमने लातूर जिल्हा न्यायालय, औरंगाबाद जिल्हा न्यायालय, औरंगाबाद उच्च न्यायालय तसेच जालना जिल्हा न्यायालय येथे झंजावाती प्रचार दौरा केला.
या दौऱ्यात विविध बार असोसिएशनमधील विधीज्ञांशी संवाद साधत ॲड. प्रमोद भोकरे यांना बार कौन्सिल निवडणुकीत प्रथम क्रमांकाचे मत देण्याचे आवाहन करण्यात आले. अनेक विधीज्ञांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत भोकरे यांच्या कार्याची दखल घेतली.
ॲड. प्रमोद भोकरे यांनी जिल्हा सरकारी वकील म्हणून कार्य करताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले काम उल्लेखनीय असल्याचे मत विधीज्ञांनी व्यक्त केले. तसेच त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व, धडाडीची कार्यशैली आणि उत्कृष्ट क्रीडा क्षेत्रातील योगदान यामुळे ते सर्वांगीण नेतृत्व म्हणून समोर आले आहेत.
मराठवाडा विभागातील या व्यापक प्रचारामुळे ॲड. प्रमोद भोकरे यांच्या विजयाचा मार्ग अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वकिलांमध्ये वाढता पाठिंबा आणि सकारात्मक वातावरण यामुळे येत्या निवडणुकीत त्यांना निश्चित यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
📰 न्यायविश्व साप्ताहिक
विधीज्ञांच्या प्रश्नांना आवाज देणारे, न्याय क्षेत्रातील घडामोडींचे अचूक व विश्वासार्ह व्यासपीठ.
आपणही न्यायविश्वशी जोडले जाऊन सत्य आणि न्यायाच्या प्रवाहात सहभागी व्हा.
Post a Comment
0Comments