“२२ वर्षांची प्रतीक्षा संपवण्याची वेळ; सक्षम नेतृत्वासाठी एकजुटीचे आवाहन”
सांगली: विशेष बातमीदार
ॲड. अर्चना सचिन उबाळे
(माजी सचिव, सांगली वकील संघटना) यांनी न्याय विश्व साप्ताहिकास प्रतिक्रिया देताना आपलं मनोगत व्यक्त केलं की....
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या प्रतिष्ठित संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने माझ्या मनातील काही भावना व्यक्त कराव्याशा वाटतात…
गेल्या अनेक वर्षांपासून आपण सर्वजण वकिली करत आहोत, न्यायासाठी लढत आहोत; पण आपल्या स्वतःच्या प्रश्नांसाठी, आपल्या हक्कांसाठी, आपल्या आवाजासाठी आपण किती वेळा सक्षम नेतृत्वाच्या शोधात होतो, हा प्रश्न आजही कायम आहे. सांगली जिल्ह्याला तब्बल २२ वर्षांपासून बार कौन्सिलवर प्रतिनिधित्व मिळालेले नाही, ही बाब मनाला कुठेतरी खंत देणारी आहे.
आज मात्र हीच पोकळी भरून काढण्याची सुवर्णसंधी आपल्या समोर उभी आहे… आणि त्या संधीचं नाव आहे – ॲड. प्रमोद अंकुश भोकरे.
मी त्यांना केवळ एक उमेदवार म्हणून पाहत नाही, तर एक संवेदनशील, धाडसी आणि वकिलांच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून जाणारं व्यक्तिमत्व म्हणून ओळखते. त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता, निस्वार्थीपणे वकिलांसाठी काम केलं आहे. हीच त्यांची खरी ताकद आहे.
विशेषतः एक महिला वकील म्हणून मला असं वाटतं की, आमच्या अनेक समस्या, अडचणी अजूनही योग्य पातळीवर पोहोचलेल्या नाहीत. त्या सोडवण्यासाठी केवळ पदावर बसणं पुरेसं नसतं, तर त्यासाठी संवेदनशील मन आणि ठाम भूमिका आवश्यक असते. आणि हे सर्व गुण ॲड. प्रमोद भोकरे यांच्यामध्ये आहेत, याचा मला पूर्ण विश्वास आहे.
त्यांची संघटन क्षमता, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती, सीनियर-ज्युनियर असा भेद न करता प्रत्येकाला आपलंसं वाटणारा स्वभाव — हे सर्व त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतं.
आज गरज आहे ती अशा नेतृत्वाची, जे केवळ बोलत नाही तर कृतीतून दाखवतं… जे पदासाठी नाही, तर जबाबदारीसाठी उभं राहतं… आणि जे प्रत्येक वकिलाच्या मनातला आवाज बनू शकतं.
म्हणूनच, मी सर्व विधीज्ञ बंधू-भगिनींना मनापासून आवाहन करते की, येत्या 24 मार्च 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीत ॲड. प्रमोद अंकुश भोकरे (क्रमांक 14) यांना प्रथम पसंतीचे मत देऊन त्यांना विजयी करावे.
चला, २२ वर्षांची प्रतीक्षा संपवूया…
चला, सांगलीचा आवाज बार कौन्सिलपर्यंत पोहोचवूया…
आणि चला, आपल्या हक्कासाठी, आपल्या भविष्यासाठी एक सक्षम नेतृत्व निवडूया…
असे भावनिक साद ॲड. अर्चना सचिन उबाळे
(माजी सचिव, सांगली वकील संघटना) यांनी मतदारांना केले आहे.
✍️
संपादक न्याय विश्व साप्ताहिक
(लेखन संकलन शब्दांकन )
Post a Comment
0Comments