सांगली : समाजहिताची जाणीव जपत पत्रकारिता आणि विधीक्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले ॲड. शिवाजी कांबळे यांचा वाढदिवस आज सांगली वकील संघटनेमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सांगली वकील संघटनेचे नूतन अध्यक्ष ॲड. चंद्रकांत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी उपस्थित वकील बांधवांनी ॲड. शिवाजी कांबळे यांच्या स्मितभाषी, प्रामाणिक आणि मनमिळावू स्वभावाचे मनापासून कौतुक केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीतून न्याय देण्याचा त्यांनी सातत्याने केलेला प्रयत्न हा समाजासाठी प्रेरणादायी असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमात बोलताना वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत माने यांनी ॲड. शिवाजी कांबळे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत, “समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी त्यांनी घेतलेली भूमिका उल्लेखनीय आहे,” असे नमूद केले.
तसेच ज्येष्ठ विधिज्ञ तथा माजी न्यायाधीश ॲड. फारूक कोतवाल यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की, “शिवाजी कांबळे हे समाजहित जपणारे आणि आपल्या निर्भीड लेखणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे व्यक्तिमत्त्व आहे.” असे आवर्जून सांगितले.
तसेच ॲड. शकील पखाली यांनीही ॲड. कांबळे यांचे कौतुक करताना, “ते उमदे नेतृत्व असून सर्वसमावेशक विचारांचे व्यक्तिमत्त्व आहे,” असे सांगितले.
सदर कार्यक्रमास सांगली वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड गजानन महाजन , ॲड अशोकराव वाघमोडे ॲड. राजेंद्र माने, हिरालाल धुमाळ, सतीश माळी, आनंद जाधव, राजाराम यमगर, सुधीर गडदे, ॲड गौतमकुमार जतकर ॲड कविता शेटे ॲड प्रवीण गोंधळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान ॲड. शिवाजी कांबळे यांनी सांगली वकील संघटनेस आर्थिक मदत संघटनेचे सेक्रेटरी ॲड.सी. बी. माळी यांच्याकडे सुपूर्द केली.
त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या भावनेचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
एकंदरीत, समाजाशी नाळ जपणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी झटणाऱ्या ॲड. शिवाजी कांबळे यांचा वाढदिवस आज सांगली वकील संघटनेमध्ये भावनिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमातील काही क्षणचित्रे..
Post a Comment
0Comments